आमची उत्पादने

तेलाचे फायदे

लाकडी घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. त्याचबरोबर लाकडी घाण्यावरील तेल हे उच्चप्रतीच्या स्वच्छ व निवडक तेलबिया वापरून काढले जाते. लाकडी घाण्यावर तेल काढतांना अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते. त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्व जपले जातात. जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे तेल मिळू शकेल.

इतर प्रकारच्या तेलांच्या तुलनेत, लाकडी घाण्याद्वारे काढल्या जाणाऱ्या तेलाला एक वेगळी चव असते त्याचबरोबर वेगळा वास येतो कारण त्या तेलात 4 ते 5 प्रकारची प्रोटीन्स असतात, तो प्रोटीन्सचाच गंध असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा खुप असतो. कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी अँसिड असते.

लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त होत नाही त्यामुळे त्यातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. आपल्याला ते सर्व घटक मिळतात की ज्या घटकांची गरज आपल्या शरीराला असते.

अपेक्स नॅचरल्स फूड प्रॉडक्ट्स येथे नैसर्गिक पद्धतीने काढलेले आणि चवदार असलेले शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, बदाम ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध आहे ज्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेल्या व्यक्तींसाठी हा एक आदर्श पर्याय आहे.

उपलब्ध सुविधा

आमची वैशिष्ठे